आवाहन
स्नेह पोषक अन्न, सगळ्या ऋतूंत संरक्षण देणारी वस्त्रे आणि सोयींनी युक्त निवारा ह्या माणसाच्या प्राथमिक गरजांमध्ये आता शिक्षण आणि आरोग्य ह्यांचाही समावेश झाला आहे. भारतात शिक्षणाचा संबंध ज्ञानार्जनाशी कमी आणि अर्थार्जनाशीच जास्त आहे. परंतु world economic forum नुसार भारतातील दरवर्षी शिक्षण घेऊन रोजगार शोधण्यास निघणाऱ्या जवळपास सव्वा कोटी तरुणांपैकी; व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील प्रत्येकी चारपैकी एकच तरुण रोजगारक्षम (employable) असतो, अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील पाच पैकी एक, तर, प्रत्येकी दहा …